Mumbai, मे 17 -- Effect of High Blood Pressure on Eyes: असे म्हटले जाते, की हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब हा 'सायलेंट किलर' आहे. डोळ्यांच्या बाबतीत तर ते आणखी खरं असतं, कारण लवकर लक्षणं दिसून न आल्यामुळे हायपरटेन्शनचे परिणाम पटकन कळून येत नाहीत. चेंबूर येथील आयुष आय क्लिनिक ए युनिट ऑफ डॉ अग्रवालस् आय हॉस्पिटलचे कॉर्निया, मोतीबिंदू, रिफ्रॅक्टिव सर्जन डॉ. मिनल कान्हेरे यांनी उच्च रक्तबादाचा डोळ्यांवर कसा परिणाम होतो याबाबत सांगितले.
उच्च रक्तदाबामुळे जसा शरीरातील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो तसाच परिणाम डोळ्यातील रक्तवाहिन्यांवर सुद्धा होतो. यामुळे रेटिनामधील लहान रक्तवाहिन्या खराब होतात किंवा फुटतात. पर्यायाने हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथीसारखी धोकादायक स्थिती तयार होते. रेटिनोपॅथी तीव्र होईपर्यंत रूग्णाला लक्षणं दिसतातच असे नाही. काही तीव्र ...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.