Mumbai, फेब्रुवारी 10 -- Valentines Day Gifts Under Rs.5000: व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली असून संपूर्ण जगात हा आठवडा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे वीकमध्ये अनेकजण आपल्या जोडीदाराला काही खास गिफ्ट्स देऊन आपल्या नात्यात गोडवा वाढवतात. जर तुम्ही इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पाच हजारांच्या आत किंमतीच्या आत असे काही गिफ्ट्स आहेत, जे पाहताच तुमचा जोडीदार खूश होईल.

स्मार्टवॉच एक अ‍ॅक्सेसरी आहे, जी स्टायलिश लुकव्यतिरिक्त आरोग्य आणि फिटनेसवर लक्ष ठेवते. जर तुमचा पार्टनर फिटनेस लव्हर असेल तर त्याला रेडमीची नवीन स्मार्टवॉच ३ हजार ३९९ रुपयांमध्ये गिफ्ट केली जाऊ शकते. यात १.९६ इंचाचा अमोलेड डिस्प्ले असून बिल्ट-इन जीपीएस देण्यात आला आहे. यात ५ एटीएम डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स देण्यात आल...