Mumbai, फेब्रुवारी 4 -- Thyroid In Children : आपल्या घशात फुलपाखराच्या आकाराची एक ग्रंथी असते ज्याला थायरॉईड म्हणतात. जेव्हा थायरॉक्सिन आणि ट्रायओडोथायरोनिन हे महत्त्वाचे संप्रेरक योग्यरित्या तयार होत नाहीत, तेव्हा थायरॉईड रोग होतो. थायरॉईड ग्रंथी तुमची वाढ, चयापचय, ऊर्जा पातळी आणि शरीराचा एकूण विकास यासारख्या विविध शारीरिक कार्यास जबाबदार आहे. ही ग्रंथी हार्मोन्स तयार करते, जे तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयवावर लक्षणीय परिणाम करतात. हार्मोन्समध्ये अचानक असंतुलन झाल्यास थायरॉईडची स्थिती विकसित होऊ शकते. थायरॉईड दोन प्रकारचे आहेत. हायपोथायरॉईडीझम (अंडरअ‍ॅक्टिव्ह थायरॉईड) आणि हायपरथायरॉईडीझम (अति सक्रिय थायरॉईड).

शरीरातील विविध लक्षणे थायरॉईड असंतुलन दर्शवू शकतात. यामध्ये अचानक वजन वाढणे किंवा वजन कमी होणे, खूप गरम होणे किंवा खूप थंडी वाजणे...