Mumbai, फेब्रुवारी 6 -- Swiggy Share Crash : क्विक कॉमर्स क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी स्विगीला तिमाही निकालानंतर मोठा झटका बसला आहे. तिमाही तोटा मोठ्या प्रमाणावर वाढल्यानं धास्तावलेले गुंतवणूकदार कंपनीचा शेअर विकून पळू लागले आहेत. त्यामुळं शेअरच्या भावानं नवा नीचांक गाठला आहे. आजच्या व्यवहारात हा शेअर आयपीओ किंमतीपेक्षाही खाली गेला.

शेअर बाजार उघडताच स्विगीचा शेअर ७ टक्क्यांहून अधिक घसरला आणि इंट्राडे नीचांकी स्तर ३८७ रुपयांवर घसरला. ही त्याची ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीचा तोटा सुमारे ८०० कोटी रुपयांवर गेला आहे.

ऑनलाइन ऑर्डरवर अन्न आणि किराणा मालाचा पुरवठा करणाऱ्या स्विगीचा निव्वळ तोटा ३१ डिसेंबर २०१९ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत वाढून ७९९.०८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच...