Mumbai, फेब्रुवारी 19 -- Solar Eclipse 2025: सूर्यग्रहण शनिवार, २९ मार्च २०२५ रोजी होणार आहे. हे ग्रहण उत्तर गोलार्धातून पाहता येईल. हे एक मोठे सूर्यग्रहण असेल, चंद्राची सावली पृथ्वीवर पडणार नसली तरी त्यामुळे हे पूर्ण सूर्यग्रहण नसून मोठे सूर्यग्रहण असेल. युरोपच्या बहुतांश भागात अंशत: सूर्यग्रहण दिसणार आहे. उत्तर अमेरिकेच्या पूर्व भागात राहणाऱ्यांना ते सहज पाहता येणार आहे.

२९ मार्चरोजी होणाऱ्या सूर्यग्रहणात चंद्र सूर्याचा ९४ टक्के भाग व्यापणार आहे. यूटीसी वेळेनुसार सकाळी ८.५० ते १२.४३ (ईडीटी वेळ पहाटे ४.५० ते ८.४३) पर्यंत हे ग्रहण दिसेल. टाईम अँड डेट वेबसाईटनुसार ८१४ दशलक्ष लोकांना हे आंशिक सूर्यग्रहण पाहता येणार आहे. २०२५ सालचं पहिलं सूर्यग्रहण शनिवार, २९ मार्च २०२५ रोजी होणार आहे. सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजून २० मिनिटांनी...