Mumbai, नोव्हेंबर 30 -- Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई-पुणे महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अपघाताची मालिका अजूनही कायम आहे. आता एक्स्प्रेस वे वर तीन ट्रकचा विचित्र अपघात झाला असून त्यात एक ट्रक रस्त्याच्या कडेला शंभर फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. ट्रकच्या चालकाला खोल दरीतून वाचवण्यात यश आलं असून या भीषण अपघातात अद्याप कोणतीही जीवीतहानी झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील बोरघाटात तीन वाहनांनी एकमेकांना जोरदार घडक दिली. त्यामुळं एक अपघातग्रस्त ट्रक थेट शंभर फूट खोल दरीत कोसळला. ट्रकमध्ये चालक असल्यानं या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला वाचवण्यास...