Mumbai, मे 20 -- पुढील महिन्यात होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election 2022) पार्श्वभूमीवर राज्यातून वेगवेगळी नावं चर्चेत येऊ लागली आहेत. संभाजीराजे भोसले (Sambhajiraje Bhosale) यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचं नाव पुढं आलं आहे. आंबेडकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडीनं (Vanchit Bahujan Aghadi) या संदर्भात महत्त्वाचा खुलासा केला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी या संदर्भात एक पत्रक प्रसिद्धीस दिलं आहे. त्यात त्यांनी आंबेडकरांच्या उमेदवारीची चर्चा चुकीची असल्याचं म्हटलं आहे. 'ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्या...