भारत, मार्च 18 -- छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे महत्व कमी करायचे अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची विचारधारा असून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपसाठी शौर्याचं प्रतिक कधीच नव्हतं. त्यामुळे व्हिलन संपवला की नायक आपोआप संपतो. त्यामुळे व्हिलनवर हल्ला करून महाराष्ट्राच्या हिरोंना संपवायची भाजप, संघाची भूमिका दिसते. महाराष्ट्राच्या जनतेने या कारस्थानापासून सावध रहायला पाहिजे, असं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नागपूर येथे सोमवारी घडलेल्या घटनेनंतर राऊत आज पत्रकारांशी बोलत होते.

राऊत म्हणाले, 'औरंगजेबाची ढाल घेऊन काही लोक या राज्यात हिंदू-मुस्लिम दंगली पेटवत आहेत. सरकार तुमच्या विचाराचं आहे तर मग दंगे कशाला करता? मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, ए...