Mumbai, फेब्रुवारी 24 -- चंद्र शनि प्रतियोगात असल्यानं आरोग्य जपा. प्रकृतीकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. वडीलधाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. बेशिस्तपणा वाढू शकतो. नियोजन गडबडेल. व्यवसायिकांना अडचणीतून मार्ग काढावा लागेल. शुल्लक कारणांवरून मानसिक भीती वाटेल. प्रियकर-प्रेयसीच्या नात्यात तणाव येईल. एकमेकांच्या वागण्याचा मानसिक त्रास होईल. कोर्टकचेरीच्या नादी लागू नका. प्रवासात काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. वाहन चालविण्यास ग्रहमान विरोधी आहे. संशयी स्वभावावर नियंत्रण ठेवा. काही मनस्ताप देण्यासारख्या घटना घडतील. शुभ रंग: केसरी शुभ दिशाः दक्षिण. शुभ अंकः ०४, ०६.

वृषभ राशीचा स्वामी शुक्र लाभदायक आहे. चंद्र भ्रमण शुभ स्थानातून होत आहे. घरात नवीन वस्तूंच्या खरेदीचा योग आहे. मुलांच्या करियर संबंधी आर्थिक तरतूद करण्यावर लक्ष द्याल. तुम्ही मांडलेल्या नव्य...