Mumbai, फेब्रुवारी 6 -- Ladki Bahin Yojana Publicity : राज्यात लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला. याचा फायदा महायुतीसरकारला झाला. विधानसभेत न भूतो न भविष्यती यश महायुतीला मिळालं. आता, या योजनेच्या व्यापक प्रसिद्धीसाठी सरकारने पुढाकार घेतला असून यासाठी ३ कोटी रुपयांना मंजूरी दिली आहे. या निधीच्या सोशल आणि डिजिटल माध्यमातून या योजनेची प्रसिद्धी केली जाणार आहे. या साठी माहिती व जनसंपर्क विभागाने माध्यम योजने तयार केली असून त्याला मंजुरी देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' जाहीर केली. या योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये महिना देण्याचे जाहिर करण्यात आले. यासाठी वार्षिक अडीच...