भारत, डिसेंबर 6 -- सध्या मालिका विश्वात अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशातच आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आहे. 'हृदयी प्रीत जागते' असे या मालिकेचे नाव असून, या मालिकेचं कथानक संगीतावर आधारित असणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने अभिनेता सिद्धार्थ खिरीड आणि अभिनेत्री पूजा कातुर्डे (Pooja Katurde) अशी नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आता ही मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे.

शैलजा ऑफिस मध्ये घोषणा करते की प्रभास नवीन वर्षात सदावर्ते कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय जॉईन करणार. इकडे वीणा प्रभास चा नंबर मिळवते आणि त्याला फोन करून उर्मीबद्दल खरं काय ते सांगायचं ठरवते. पण काही न काही कारणामुळे ती यशस्वी होत नाही. तर दुसरीकडे प्रभास ला वीणा आपल्या बँड मध्ये हवी आहे.

उर्मी ला कळतं कि वीणाने प्रभासला सत्य सांगण्यासा...