Mumbai, फेब्रुवारी 4 -- Dhananjay Munde on Anjali Damania Allegations: धनंजय मुंडे राज्याचे कृषीमंत्री असताना १६१.६८ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. दमानिया यांच्याआरोपाचं मी खंडन करतो. त्यांनी केलेले आरोप खोटेअसूनत्यांनी आत्मचिंतन करायला हवं. आजपर्यंत दमानिया यांनी केलेल्या आरोपांचे पुढे काय झाले ते त्यांनी पाहावे, असं मुंडे यांनी म्हटले आहे.

त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करण्यापलीकडे यात काही नाही. ज्या निविदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला ती संपूर्ण प्रक्रिया मार्च २०२४ मध्ये शासकीय नियम आणि धोरणाला अनुसरूनच राबवण्यात आली आहे. मागील ५० दिवस त्य...