Chhatrapati sambhaji nagar, एप्रिल 17 -- आई-वडील व भाऊ-बहिणीचे नाते सर्वात पवित्र नाते समजले जाते. मात्रसंपत्तीच्या हव्यासाठी जमिनीसाठी रक्ताची नातीच एकमेकांच्या जीवावर उठतात. सख्खे भाऊ पक्के वैरी होतात. संपत्तीच्या वादातून एकमेकांचे खून पडल्याच्या घटना आपण नेहमी ऐकत किंवा वाचत असतो. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati sambhaji nagar) एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका तरूणाने जन्मदात्या बापाला संपवल्यानंतर आईचाही गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला.

Raj Thackeray : शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करा, राज ठाकरेंचे सरकारला पत्र, मनसैनिकांनाही केलं 'हे' आवाहन

कर्जबाजारीला कंटाळून आरोपी मुलाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. मुलाने बापाचा खून केल्यानंतर आईलाही गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आह...