भारत, फेब्रुवारी 12 -- मराठी लेखकांना देशी आणि विदेशी साहित्य आणि निर्मिती तंत्रांची माहिती देत, नाना प्रकारच्या उदाहरणाची मांडणी करीत 'अवघे करावे शहाणे लेखकजन' या उदात्त जीवनध्येयाने प्रेरित होवून इब्राहीम अफगाण यांनी लिहिलेले 'ललित लेखनातील मूळ घटक आणि घाटांच्या चर्चेचा सम्यक अभ्यास' हे पुस्तक म्हणजे मराठी साहित्य खजिन्यातील अनमोल असे रत्न आहे.

सतत लेखन करणारे पट्टीचे लेखक असू देत किंवा गटांगळ्या खाणारे, नाकातोंडात पाणी जावून घाबरणारे नवशिके लेखक असू देत, सर्वांसाठी हे पुस्तक म्हणजे लेखनगंगेकाठचा सुबक, देखणा, विस्तीर्ण आणि मजबूत आखीव रेखीव घाट आहे. या शब्दघाटाच्या पायऱ्या वाचक जितक्या वेळा उतरेल, चढेल तितके ज्ञानमोती तो वेचू शकेल याची शंभर नव्हे तर हजार टक्के खात्री !

पाश्चात्य साहित्यविश्वात स्व-मदत म्हणजे How to do किंवा प्रेरणादायी...