भारत, फेब्रुवारी 26 -- Hyperloop train: भारतातील पहिला हायपरलूप प्रकल्प मुंबई ते पुणे दरम्यान प्रस्तावित आहे. सध्या दोन्ही शहरातील हे अंतर ३-४ तासात कापले जाते, तर हायपरलूपच्या माध्यमातून हा प्रवास अवघ्या २५ मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. रिपोर्टनुसार, एका हायपर लूपच्या एका पॉडमध्ये २४ ते २८ प्रवासी बसू शकतात. हार्ड हायपरलूपची पहिली यशस्वी चाचणी २०१९ मध्ये करण्यात आली आहे.

हायपरलूप ही एक हाय-स्पीड ट्रेन आहे, जी ट्यूबमधील व्हॅक्यूममध्ये चालवली जाते. या रेल्वेचा कमाल वेग ताशी १००० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. यामध्ये व्हॅक्यूम ट्यूबमध्ये चुंबकीय तंत्रज्ञानावर ही ट्रेन चालवली जाते. या यंत्रणेसाठी ऊर्जा ही कमी प्रमाणात लागत असून प्रदूषणाचे प्रमाण देखील अतिशय कमी आहे. या रेल्वेतून जवळपास शून्य प्रदूषण निर्माण होते.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी ...