Mumbai, फेब्रुवारी 12 -- Rajan Salvi Resigned From UBT : उद्धव ठाकरेंना कोकणात मोठा धक्का बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवीयांनी बुधवारी शिवसेना ठाकरे पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याचबरोबर साळवी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. राजन साळवी उद्या (गुरुवार) दुपारी ३वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

विनायक राऊत यांच्याशी झालेल्या वादात उद्धव ठाकरे यांनी राऊतांची बाजू घेतल्यामुळे साळवी दुखावले गेले होते. यामुळे त्यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. राजन साळवी यांच्या जाण्याने ठाकरे गटाला कोकणात मोठे नुकसान होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड के...