Mumbai, फेब्रुवारी 12 -- Eknath Shinde on Sanjay Raut: दिल्लीत एका कार्यक्रमात शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना' महादजी शिंदे राष्ट्र गौरव' पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे व शरद पवार यांनी एकमेकांचे आपल्या भाषणात कौतुक केले. यानंतर संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवारांनी शिंदेंचा असा सन्मान करणं दुर्देवी आहे, ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो. त्यांच्यासोबत खुलेआम बसणे आणि त्यांना असे सन्मान आपल्या हातून देणं ही योग्य गोष्ट नाही, अशी जाहीर नाराजी राऊतांनी व्यक्त केली आहे. यावर खासदार अमोल कोल्हे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.

त्यांना द्वेषाने पछाडलं आहे. आतापर्यंत त्यांना शरद पवार साहेब वंदनीय होते,पण पवार साहेबांनी माझा सत्कार केल्यानंत...