भारत, फेब्रुवारी 25 -- ओडिशातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील वसतिगृहात शिकणारी दहावीची विद्यार्थिनी आई बनल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थिनी अनेक महिने गरोदर होती, तर शाळा व्यवस्थापनाला याची माहिती कशी मिळाली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. असा प्रश्न मुलीचे वडीलही विचारत आहेत. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मलकानगिरी जिल्ह्यातील चित्रकोंडा भागातील एका सरकारी निवासी शाळेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने मुलाला जन्म दिला. ही शाळा राज्याच्या एससी/एसटी विभागामार्फत चालवली जाते. परीक्षा आटोपून परतल्यानंतर काही तासांतच ही घटना घडली. विशेष म्हणजे अनेक महिने गरोदर राहिल्यानंतरही ती वर्ग आणि परीक्षांना हजर होती.

विद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगितले की, जेव्हा मी शाळेत पोहोचलो तेव्हा मला सांगण्यात आले ...