Patna, फेब्रुवारी 16 -- नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर आपली प्रतिक्रिया देताना माजी रेल्वेमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी कुंभमेळ्याती स्नानाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकारण तापलं आहे. रेल्वेच्या गैरकारभारामुळे चेंगराचेंगरी झाली आणि इतके लोक मृत्युमुखी पडले, असे लालू यादव यांनी आधी म्हटले. याची जबाबदारी घेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा. त्यानंतर कुंभमेळाच फालतू असल्याचे लालू यादव म्हणाले.

एनडीएच्या घटक पक्षांनी राजद प्रमुखांच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रभाकर मिश्रा आणि जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन यांनी लालू यादव यांना या दुर्घटनेवर राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे. आरएलएमचे राष्ट्रीय ...