भारत, फेब्रुवारी 5 -- विदर्भाच्या विविध जिल्ह्यातून येऊन मुंबई राहत असलेल्या वैदर्भीय नागरिकांनी कोकणी माणसाचा आदर्श ठेवत विदर्भाच्या संपर्कात राहून विदर्भाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीक व भाभा अणुसंशोधन केंद्राचे माजी अणुशास्त्रज्ञ डॉ. सुरेश हावरे यांनी केले. 'आपला विदर्भ' या सामाजिक, सांस्कृतिक संस्थेच्या तिसऱ्या स्नेहसंमेलनात ते बोलत होते. नवी मुंबईतील खारघर येथील एमटीडीसी रेसिडेन्सीमध्ये पार पडलेल्या स्नेहसंमेलनात ज्येष्ठ सनदी अधिकारी चंद्रकांत डांगे, 'आपला विदर्भ'चे अध्यक्ष ॲड. विजयकुमार कोहाड, सरचिटणीस प्रमोद चुंचूवार आणि कोषाध्यक्ष अनंत शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मुंबई, नवी मुंबई तसेच ठाणे परिसरातून आलेले वैदर्भीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मूळ अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट ये...