MUMBAI, फेब्रुवारी 28 -- भारतात मुंबईला शरीरसौष्ठवाची ताकद बनविताना शरीरसौष्ठवाचा पाया असलेल्या ज्युनियर मुंबई श्री स्पर्धेत अटीतटीच्या पीळदार संघर्षात जय भवानी व्यायामशाळेच्या वैभव गोळेने बाजी मारली. तसेच महिलांच्या शरीरसौष्ठवात रेखा शिंदेने आपले वर्चस्व दाखविताना मिस मुंबइवर आपलेच नाव कोरले.

ज्युनियर मुंबई मेन्स फिजीक प्रकारात साहिल सावंत विजेता ठरला. मास्टर्स मुंबई श्री स्पर्धेत संकेत भरम (४०-५० वर्षे), संसार राणा (५०-६० वर्षे) आणि विष्णू देशमुख ( ६० वर्षावरील) यांनी सोनेरी यश मिळवले.

मालाड पूर्वेला कासम बागेतील दीनदयाल उपाध्याय मैदानावर हजारो शरीरसौष्ठवप्रेमींच्या उपस्थितीत तब्बल पाऊणेदोनशे ज्यूनियर शरीरसौष्ठवपटूंचा पीळदार थरार रंगला. ओम जय वरदानी ट्रस्ट आयोजित बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटन...