Beed, फेब्रुवारी 14 -- Suresh Dhas Dhananjay Munde Meeting : केज तालुक्यातीलमस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. विरोधी पक्षासह भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांची राळ उठवून त्यांना चांगलेच घेरले होते. धस यांनी मुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांची भेट घेऊन मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र आता दोघांमध्ये समेट झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. या दोघांची चार दिवसाआधी एका खासगी रुग्णालयात गुप्तपणे भेट झाल्याचा दावा केला जात असून ही भेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.

संतोष देशमुख हत्या व खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात असून त्याचा आका मुंडे अ...