भारत, जानेवारी 28 -- राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाते नेते बाबा सिद्धिकी यांची काही महिन्यापूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात त्यांचा मुलगा माजी आमदार झिशान सिद्दिकी यांचा जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवला आहे. यावेळी झिशान सिद्दीकी यांनी सांगितले की, बाबा सिद्धिकी रोज डायरी लिहायचे, त्यामध्ये ज्या दिवशी हत्या झाली तेव्हा भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख डायरीत केला होता. झिशान सिद्धिकी यांचा जबाब समोर येताच या प्रकरणावर मोहित कंबोज यांनी खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले की, माध्यमांमध्ये गरमागरम चर्चेसाठी मुद्द्याचा विपर्यास केला जात आहे. या हत्या प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये माझे कुठेही नाव नाही.

माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी वडील बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात पोलिसांना काही नावे दिली आहेत. त...