भारत, जुलै 18 -- Air India Flight Crash: एअर इंडियाचे विमान 171 च्या दुर्घटनेनंतर प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला आहे. अपघातापूर्वी वैमानिकांचे संभाषणही शोधण्यात आले आहे. कॉकपिट रेकॉर्डिंगचा हवाला देत पायलटने इंजिनचा इंधन पुरवठा बंद केल्याचा दावा अमेरिकी प्रसारमाध्यमे करत आहेत. मात्र, भारताने तो साफ फेटाळून लावला आहे.

अमेरिकेच्या ब्लूमबर्ग आणि वॉल स्ट्रीट जर्नल (WSJ) सारख्या माध्यमांनी दावा केला आहे की कॅप्टन सुमित सभरवाल यांनी फ्यूल कंट्रोल स्विच कटऑफ स्थितीत ठेवले होते. मात्र, भारताच्या विमान अपघात अन्वेषण ब्युरोने (AAIB) हा अहवाल बेजबाबदार आणि बिनबुडाचा असल्याचे म्हटले आहे. हा अहवाल सरसकट फेटाळण्यात आला आहे.

अहवालात काय म्हटले आहे?

डब्ल्यूएसजे आणि ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, कॅप्टन सुमित सभरवाल यांनी फ्यूल कंट्रोल स्विच बंद केले होते....