भारत, मार्च 18 -- नागपुरातील एका धर्माच्या पवित्र ग्रंथाचे दहन केल्याच्या अफवेमुळे सोमवारी रात्री हिंसाचार उफाळला होता. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आतापर्यंत ५० जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाने नागपूर शहरात अनेक भागात संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत.
नागपूर शहरातील कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली आणि शांतीनगर या पोलिस ठाण्यांचा हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शिवाय सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी कायम राहणार असल्याची माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली.
महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नागपुरात नुकताच झालेला हिंसाचार अत्यं...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.