भारत, जुलै 28 -- Nag Panchami : यंदा २९ जुलै रोजी येणाऱ्या नागपंचमीला पाच खास योग येत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक वर्षांनंतर यंदा नागपंचमीला मंगळागौरी आणि नागपंचमीची युती एकत्र येत आहे. मान्यतेनुसार कालसर्प योगापासून मुक्त होण्यासाठी नागपंचमी हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. यावेळी नागपंचमीला पूजा करणाऱ्यांना भगवान शिव, माता पार्वती, नागदेव तसेच शक्तीचा आशीर्वाद मिळेल. तब्बल ४४ वर्षांनंतर नागपंचमीला मंगळागौरी योगाचा अद्भुत योगायोग तयार होत आहे.

या दिवशी भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करणे आणि पूजेदरम्यान नाग गायत्रीचा जप करणे खूप लाभदायक ठरते. यंदा नागपंचमीच्या दिवशी पूजा करण्याची उत्तम वेळ सकाळी ५ वाजून ४० मिनिटांपासून ८ वाजून २० मिनिटांपर्यंत असेल. या काळात पूजा वगैरे करावी.

trends.embed.renderExploreWidget("TIMESERIES", {"com...