Faridabad, एप्रिल 26 -- दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर हरियाणातील नूंह जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला, तर ४ जण जखमी झाले. पोलिसांनी मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर नूंह पोलीस स्टेशन फिरोजपूर झिरका सीमेवरील इब्राहिमवास गावाजवळ आज सकाळी १० च्या सुमारास एका अनियंत्रित पिकअप वाहनाने ११ सफाई कामगारांना चिरडले. या भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या चौघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. मृतांमध्ये...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.