भारत, मे 13 -- एक पॉर्नस्टार म्हणून करिअरला सुरुवात करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. (Sunny leone) आज प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये तिचे नाव घेतले जाते. पण सनीचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. सुरुवातीला तिने अनेक अडल्ट चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर सनी भारतात आली आणि तिचे 'बेबी डॉल' हे गाणे हिट ठरले. या गाण्याने सनीचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. आज १३ मे रोजी सनीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने चला जाणून घेऊया सनी आणि तिचा पती डेनियलची लव्हस्टोरी..

सनी आणि डेनियलच्या भेटीच्या एक किस्सा सनीने स्वत: एका मुलाखतीमध्ये सांगितला होता. लॉस वेगसमध्ये एक शूट सुरु होतं. सनी तिच्या मैत्रीणीसोबत तिथे गेली होती. त्यावेळी सनीचा ब्रेकअप झाल्यामुळे ती निराश होती. तसेच सिंगल असल्यामुळे तिने अनेक गोष्टींचा विचार केला होता. आता फिरायच...