New delhi, मे 13 -- जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात सुरक्षा दलआणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारानंतर लष्कराने प्रत्युत्तर दिल्याची माहिती समोर आली आहे. या परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे. या दहशतवाद्यांचा पहलगाम हल्ल्याशी संबंध आहे की नाही याची पुष्टी अद्याप झालेली नाही.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील शुक्रू केलर भागात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात घेराव घालून शोधमोहीम सुरू केली.
कुलगाम जिल्ह्यातून चकमकीला सुरुवात झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला, त्यानंतर प्रत्युत्तरादाखल चकमक सुरू झाली. लष्कराच्या प्रत...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.