भारत, जून 30 -- ऑपरेशन सिंदूरनंतर, भारताने मोठी तयारी सुरू केली आहे. भारत एक-दोन नव्हे तर ५२ उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहे. हे सर्व उपग्रह पूर्णपणे लष्करासाठी काम करतील. यामुळे पाकिस्तानसह शत्रू देशांच्या भूभागावर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. याशिवाय लष्करासाठी खास स्पेस डॉक्ट्रिन अंतिम करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने सॅटेलाईट सिस्टिमच्या मदतीने पाकिस्तानच्या विविध लष्करी तळांवर यशस्वी नजर ठेवली होती. यामुळे लष्कराला अचूक लक्ष्य निश्चित करण्यात मदत झाली.
पाळत ठेवण्याच्या कार्यक्रमाचा भाग
भारताने केलेले हे उपग्रह प्रक्षेपण अंतराळ आधारित देखरेख कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याचा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या कार्यक्रमाल...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.