Jaunpur, एप्रिल 26 -- Veer Bahadur Singh Purvanchal University : उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील वीरबहादूर सिंग पूर्वांचल विद्यापीठात धक्कादायक प्रकार घडला आहे. परीक्षेची श्रेणी देताना दोन प्राध्यापकांनी घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. 'जय श्रीराम', क्रिकेटपटूंची नावे आणि उत्तराऐवजी इतर अप्रासंगिक मजकूर लिहिणाऱ्या डीफार्मच्या विद्यार्थ्यांना प्राध्यापकांनी चक्क पास केल्याचं उघडकीस आलं आहे.

'आजतक'नं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. त्यानुसार, उद्देश्य आणि दिव्यांशू सिंह या दोन विद्यार्थी नेत्यांनी आरटीआय अंतर्गत माहिती मागवली होती. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांकडून लाच घेऊन त्यांना उत्तीर्ण केल्याचा विद्यार्थी नेत्यांचा आरोप होता. त्यामुळं डी फार्म अभ्यासक्रमाच्या सुमारे १८ विद्यार्थ्यांचे रोल नंबर मागवून त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या प्रती घेऊन त्...