Mumbai, फेब्रुवारी 6 -- Zomato Name Change : देशातील नव्या पिढीच्या तोंडात रुळलेलं झोमॅटो हे नाव आता इतिहासजमा होणार आहे. देशातील सर्वात मोठी ऑनलाइन फूड आणि किराणा डिलिव्हरी कंपनी असलेल्या झोमॅटो कंपनीचं नाव आता बदललं जाणार आहे.

कंपनीच्या संचालक मंडळानं या नामांतरास मंजुरी दिली आहे. त्यानुसार कंपनीचं नवं नाव 'इटर्नल' असं असेल. या नव्या नावाच्या लोगोचं अनावरणही करण्यात आलं आहे. संचालक मंडळाच्या निर्णयानंतर कंपनीचे सीईओ दीपिंदर गोयल यांनीही शेअरहोल्डर्सना उद्देशून सविस्तर पत्र लिहिलं आहे. आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगतानाच त्यांनी शेअरहोल्डर्सच्या पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

झोमॅटो ही अ‍ॅक्सिडेंटल कंपनी आहे. गेल्या वर्षी २३ डिसेंबरला आम्ही शेअर बाजारात एन्ट्री केली. बरोब्बर १७ वर्षांपूर्वी याच तारखेला मी फूडबे म्हणून Zomato ला ...