भारत, नोव्हेंबर 28 -- russia cup football fight: कतारमध्ये सध्या FIFA विश्वचषक २०२२ चा थरार सुरू आहे. या स्पर्धेत दररोज रोमहर्षक सामन्यांची मेजवानी फुटबॉल रसिकांना मिळत आहे. पण अशातच रशियामध्ये एका फुटबॉल सामन्यादरम्यान एक असे कृत्य घडले आहे, जे कोणत्याही फुटबॉल चाहत्याला आवडणारे नाही. सामन्यादरम्यान दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भिडले आणि एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. सामनाधिकारी आणि इतरांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.

रशियन कप फुटबॉल स्पर्धेत रविवारी (२७ नोव्हेंबर) क्रेस्टोव्स्की स्टेडियमवर झेनिट सेंट पीटर्सबर्ग आणि स्पार्टक मॉस्को यांच्यात सामना झाला. या सामन्या दरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंनी सर्व हद्द पार करून मैदानात तुफान राडा घातला. सामन्यादरम्यान भर मैदानात दोन्ही संघांच्या...