Mumbai, सप्टेंबर 30 -- 10 Minutes Yoga Poses: ऑफिसचं काम म्हटलं की तासन् तास एकाच ठिकाणी लॅपटॉपसमोर बसून काम करणं आलंच. खूप कमी लोक असे असतात जे या दरम्यान स्वतःसाठी थोडा सेल्फ केअर वेळ काढू शकतात. ऑफिसमध्ये तासन्तास लॅपटॉपसमोर बसून राहण्याचा परिणामही आपल्या शरीरावर स्पष्टपणे दिसून येतो. सतत बसल्याने वजन वाढणे, पोट सुटणे, कंबर आणि खांद्यात दुखणे आणि बरेच काही समस्या होतात. अशा वेळी अकाली म्हातारपण येऊ नये म्हणून शरीराला शारीरिक हालचालींचा काही डोस देत राहणे अत्यंत गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशी काही योगासने सांगणार आहोत जे तुम्ही तुमच्या कामातून थोडा वेळ काढून सराव करू शकता. एकूणच आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरतील. ही योगासनं तुम्ही अगदी १० मिनिटं सुद्धा करू शकता.

आपल्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढून तुम्ही वज्रा...