Mumbai, जानेवारी 27 -- Share Market News : उद्योग जगतात तिमाही निकालांची मालिका सुरू असून येस बँकेनंही निकाल जाहीर केले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा जवळपास तिपटीनं वाढून ६१२ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २३१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. ताज्या निकालाचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारात उमटले असून बँकेचा शेअर चांगलाच उसळला आहे.

आज सकाळच्या सत्रात कंपनीच्या शेअरची किंमत ३ टक्क्यांहून अधिक वाढली. सोमवारी बीएसईवर येस बँकेचा शेअर १८.६५ रुपयांवर उघडला. दिवसभरात कंपनीचा शेअर ३.३९ टक्क्यांनी वधारून १८.८७ रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षभरात बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत २५ टक्क्यांहून अधिक घसरली आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न वाढून ९,३४१ कोटी रुपयांवर पोह...