Mumbai, मार्च 15 -- WPL Final Score MI vs DC : महिला प्रीमियर लीग २०२५चा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियमवर दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग हिने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

यानंतर मुंबई इंडियन्सने निर्धारित २० षटकात ७ बाद १४९ धावा केल्या. WPL २०२५ मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर आतापर्यंत कोणत्याही संघाने केलेली ही सर्वात कमी धावसंख्या आहे. अंतिम सामन्यात एमआयची फलंदाजी संघर्ष करताना दिसली, परंतु कर्णधार हरमनप्रीत कौर हिने एकहाती लढा दिला आणि ६६ धावांची खेळी खेळली.

तिच्याशिवाय मोसमातील सर्वाधिक धावा करणाऱ्या नॅट सीव्हर-ब्रंटनेही ३० धावांचे योगदान दिले.

WPL २०२५ मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या १६६ धावा होती, जी एलिमिनेटर सामन्यात ग...