भारत, जून 25 -- पांढरे कोड हा एक त्वचेचा आजार आहे ज्यामध्ये रंगद्रव्य कमी झाल्यामुळे त्वचेवर पांढरे डाग पडतात. जेव्हा मेलेनिन (त्वचेच्या रंगासाठी जबाबदार रंगद्रव्य) तयार करणाऱ्या पेशी काम करणे थांबवतात किंवा मृत पावतात तेव्हा असे होते. जरी ते हानिकारक किंवा संसर्गजन्य नसले तरी, त्वचारोग हा अनेकदा चुकीच्या समजुतींनी वेढलेला दिसून येतो ज्यामुळे प्रभावित लोकांमध्ये गोंधळ आणि तणावाची समस्या निर्माण होते. हा लेख पांढरे कोड म्हणजेच विटीलिगो संबंधित गैरसमजूती दूर करण्यास मदत करतो. याबद्दल अधिक जाणून घेत तज्ञांच्या मदतीने सर्व गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. नवी मुंबई येथील मेडिकव्हर हॉस्पिटल्सच्या प्लास्टिक, कॉस्मेटिक, रिकन्स्ट्रक्टिव्ह, हँड अँड ब्रॅचियल प्लेक्सस सर्जन डॉ. रिधिमा सचदेवा यांनी याबाबत सांगितले....