Mumbai, ऑक्टोबर 8 -- Foods to Boost Mental Health: दरवर्षी १० ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक मानसिक आरोग्य साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल जागरूक करणे आणि मानसिक आजारांबद्दल माहिती देणे हा आहे.

जसे तुम्ही अन्न खाता तसे मन होते, असे लोकांना म्हणताना तुम्ही ऐकले असेल. ही म्हणही वैद्यकीय विश्वानुसार तपासून पाहिली तर ती एकदम फिट बसते. खरं तर एखादी व्यक्ती काय खात आहे याचा थेट परिणाम त्याच्या शारीरिक आरोग्यावरच नाही तर मानसिक आरोग्यावरही होतो. नैराश्य, चिंता आणि अनेक गंभीर मानसिक समस्या अन्नाशी संबंधित आहेत. योग्य आणि संतुलित आहाराद्वारे व्यक्ती अनेक मानसिक समस्या टाळू शकते. व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे संभ्रमाची स्थिती निर्माण होते. त्याचबरोबर अँटिऑक्सिडेंट पदार्थांमुळे श...