भारत, एप्रिल 7 -- World Health Day 2025 : दरवर्षी 7 एप्रिलला जगभरात जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातोय. याची सुरुवात १९५० साली जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केली होती. सन १९४८ साली ७ एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जावा असा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर १९५०पासून हा दिवस साजरा केला जातोय. आज जगभरात ७४ वा जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यात येतोय.

दरवर्षी डब्ल्यूएचओ जागतिक आरोग्य दिनासाठी एक विशिष्ट थीम जाहीर करते जेणेकरून चिंतेचे एक महत्त्वाचे क्षेत्र अधोरेखित होईल. 2025 ची थीम "निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य" (healthy beginnings hopeful futures)आहे. ७ एप्रिल २०२५ रोजी साजरा होणारा जागतिक आरोग्य दिन, माता आणि नवजात शिशुंच्या आरोग्यावरील वर्षभर चालणाऱ्या मोहिमेला सुरुवात करेल. निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य या शीर्षकाच...