Mumbai, ऑक्टोबर 6 -- Causes and Treatment of Cerebral Palsy: आपला मेंदू संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवतो. त्यात काही चूक झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण आयुष्यावर होतो. गर्भाच्या मेंदूला होणारे कोणतेही नुकसान, विशेषत: गर्भधारणेदरम्यान हा धोका वाढतो. असाच एक मेंदूचा आजार म्हणजे सेरेब्रल पाल्सी. सेरेब्रल पाल्सी मुले आणि प्रौढ दोघांनाही प्रभावित करते. या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी ६ ऑक्टोबर रोजी जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन साजरा केला जातो. जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन ही २०१२ मध्ये सुरू झालेली जागतिक चळवळ आहे. सेरेब्रल पाल्सी असलेल्या लोकांना, त्यांचे कुटुंबीय, समर्थक आणि १०० हून अधिक देशांतील संस्थांना एकत्र आणण्याचा या विशेष दिवसाचा उद्देश आहे.

सेरेब्रल पाल्सी हे एक शारीरिक व्यंग आहे, जे हालचाल आणि स्थितीवर परिणाम करते. सेरेब्रल पाल्स...