Mumbai, फेब्रुवारी 3 -- Cancer Reasons In Young Generation : कर्करोग हा एक गंभीर आजार असून, तो मनुष्याच्या आयुष्याची गती रोखून ठेवतो. अनेक लोक या आजारामुळे मृत्यूच्या दारात पोहोचतात. जगभरात कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. विशेषत: तरुण लोकांमध्ये या आजाराचे प्रमाण चिंतेत टाकणारे आहे. बीएमजे ग्रुपच्या अहवालानुसार, १९९९ ते २०१९ या कालावधीत पन्नास वर्षांखालील लोकांमध्ये कर्करोगाचे प्रमाण ७९ टक्क्यांनी वाढले आहे. यातही स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण इतर कर्करोगांच्या तुलनेत अधिक आहे आणि या कारणामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे.

कर्करोगाच्या वाढत्या प्रकोपावर डॉक्टरांचे म्हणणे आहे की, या आजाराची सुरुवात आपल्या दैनंदिन सवयींमुळे होऊ शकते. कर्करोगाच्या उपचाराला उशीर झाल्यास, तो अधिक गंभीर होऊ शकतो आणि अखेर मृत्यूला कारणीभूत ठरू ...