Mumbai, फेब्रुवारी 4 -- World Cancer Day 2025 : भारतात कर्करोगाने पिडीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी किंवा निदान झाल्यास त्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी सक्रिय पाऊल उचलणे गरजेचे आहे. कर्करोग म्हणजे जेव्हा तुमच्या शरीरातील असामान्य पेशी ज्या अनियंत्रितपणे वाढू लागतात. जवळजवळ १०० प्रकारचे कर्करोग आहेत, जे तुमच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर परिणाम करतात आणि त्यांना समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. कर्करोगाबद्दल माहिती आणि जागरूकतेमुळे सुरुवातीच्या टप्प्यात कर्करोगाचे निदान होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर जीवनाची गुणवत्ता सुधारते. आपल्या शरीरातील ही असामान्यता वेळीच शोधण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे ठरू शकते, असे रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अमोल पवार म्हणतात.

> मला कोणत्या...