Mumbai, ऑक्टोबर 4 -- strange animals of the world: पृथ्वीवर अनेक नैसर्गिक चमत्कार घडत असतात, ज्यापैकी अनेक गोष्टींबद्दल मानव अजूनही अनभिज्ञ आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही प्राण्यांबद्दल सांगणार आहोत जे काहीही न खाता कित्येक महिने जगू शकतात, जे ऐकून तुम्हाला एकदा तरी विचार येईल की, ते खरोखरच आपल्या आजूबाजूला राहतात का? तर हे सत्य आहे. आपल्या आजूबाजूला असे काही प्राणी आहेत ज्यांना अनेक दिवस न खाता जगता येते. आज 'जगातील पशु दीना'च्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्यामध्ये नेमकं काय आहे, ज्यामुळे ते इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहेत.

पेंग्विन ज्याठिकाणी राहतात तिथे तापमान इतके कमी असते की त्याची भूक आपोआप कमी होते. अशा परिस्थितीत, ते २ ते ४ महिने काहीही खाल्ल्याशिवाय राहू शकतात. विशेष म्हणजे जेव्हा शून्यापेक्षा कमी तापमानात शिकारीची वेळ येते, त...