Mumbai, फेब्रुवारी 1 -- Wheat Allergy Care Tips : अन्न केवळ व्यक्तीचे पोट भरत नाही, तर शरीराला आवश्यक असणारी अनेक पोषक तत्वे देखील पुरवते. संतुलित आहारामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीराला रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. पण, जर हा आहार शरीरासाठी चुकीचा ठरला तर रोगप्रतिकारक शक्तीत बिघाड होऊन, फूड अ‍ॅलर्जीदेखील होऊ शकते. सामान्यत: शरीराची रोगप्रतिकारक शक्ती बॅक्टेरिया, विषाणू किंवा इतर विषारी पदार्थांपासून शरीराचे संरक्षण करते. पण काही वेळा काही पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती बिघडते. ज्यामुळे शरीरात विकार निर्माण होऊ लागतात. ज्याला फूड अ‍ॅलर्जी म्हणतात.

गव्हामध्ये असलेल्या ग्लोब्युलिन, ग्लियाडिन, अ‍ॅल्ब्युमिन आणि प्रोटीनमुळे काही लोकांना अ‍ॅलर्जीची समस्या उद्भवू शकते. सेलिआक रोगात, गव्हामध्ये असलेल्या ग्लूटेनमुळे एखाद्या व्यक...