Mumbai, फेब्रुवारी 6 -- Whatsapp News: व्हॉट्सअ‍ॅपच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लवकरच नवीन फीचर जोडले जाणार आहे. या फीचरमुळे वापरकर्त्यांना पाणी, वीज, गॅससह इतर अनेक गोष्टींचे बिल भरता येणार आहे.

एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप भारतातील युजर्ससाठी एका नव्या फीचरवर काम करत आहे. असे म्हटले जात आहे की, नवीन फीचर्स आणल्यामुळे युजर्सजवळपास सर्व प्रकारची बिले थेट व्हॉट्सअ‍ॅपवरून भरू शकतील. नोव्हेंबर २०२० मध्ये व्हॉट्सअ‍ॅपने देशात युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआयद्वारे पैसे पाठविण्याचा आणि प्राप्त करण्याचा पर्याय सुरू केला होता. अलीकडेच नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मेटा- मालकीच्या प्लॅटफॉर्मसाठी यूपीआय ऑनबोर्डिंग मर्यादा काढून टाकली, ज्यामुळे भारतातील सर्व वापरकर्त्यांसाठी आपल्या पेमेंट सेवांचा विस्तार करण्...