भारत, जानेवारी 31 -- पाकिस्तानात सध्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाकिस्तानात सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे नेते मोठमोठ्या सभांना संबोधित करताना दिसत आहेत. यात प्रामुख्याने पाकिस्तान मुस्लिम लिग नवाझ गट (Pakistan Muslim League (N) चे नेते, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ, शरिफ यांचे बंधु आणि माजी पंतप्रधान शाहबाज शरिफ, शरिफ यांची कन्या मरियम नवाज, पाकिस्तान पीपल्स पार्टी (Pakistan People's Party) चे अध्यक्ष, माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो-झरदारी यांच्या ठिकठिकाणी लाखोंच्या सभा होत आहे. यंदाच्या पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकांमधून एक चेहरा गायब दिसतोय, तो म्हणजे पाकिस्तान तहरिक इन्साफ (Pakistan Tehreek-e-Insaf) या पक्षाचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे होय. एप्रिल २०२२ मध्ये पाकिस्तानात घडलेल्या नाट्यमय ...