Mumbai, फेब्रुवारी 7 -- Weight Loss Tips In Marathi: लठ्ठपणाची समस्या आज खूप सामान्य झाली आहे. बहुतेक वेळा आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या आणि राहण्याच्या सवयी याला कारणीभूत असतात. आज जिथे आपल्या दैनंदिन दिनक्रमात शारीरिक हालचाली कमी होत आहेत, तिथे आपला आहार जंक फूड आणि फास्ट फूडकडे वळत आहे. अशा तऱ्हेने लठ्ठपणाच नव्हे तर इतरही अनेक आजार होण्याचा धोका वाढतो. जर तुम्हीही लठ्ठपणाने त्रस्त असाल आणि वजन कमी करू इच्छित असाल तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या आहारात आणि दैनंदिन दिनचर्येत बदल करावा लागेल. चांगली गोष्ट म्हणजे घरातील काही कामे करून तुम्ही चांगला वर्कआऊटही करू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज भासणार नाही आणि तुम्हाला एकत्र दोन कामेही करावी लागतील. चला तर मग जाणून घेऊया अशी कोणती घरगुती कामे आहेत जी आपल्या वजन कमी करण्याच...