Mumbai, फेब्रुवारी 10 -- Weight Loss Tips In Marathi : पोळी हा भारतीय जेवणाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या पोळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे तसेच कार्बोहायड्रेट्स असतात. हे सर्व पोषक घटक शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मात्र हल्ली वाढत्या लठ्ठपणामुळे लोक पोळी खाणे टाळू लागले आहेत. त्यांना वाटते की, पोळी कमी खाल्ल्याने त्यांचे वजन कमी होऊ शकते. तर, काही लोकांना असे वाटते की, गव्हाची पोळी खाल्ल्याने वजन वाढते. पण, गव्हाच्या पिठात काही गोष्टी मिसळून खाल्ल्याने वजन कमी होण्याबरोबरच आरोग्य संतुलित रखण्यासाही मदत होते. आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही तुमच्या पिठात मिसळून त्यांची पोळी बनवू शकता. या पोळ्या तुमच्या शरीरासाठी फॅट कटरसारखे काम करतील.

पोळी बनवण्यासाठी ग...