Mumbai, एप्रिल 29 -- एप्रिल अखेर आणि मे महिन्याची सुरवात काही राशींना भाग्यदायक ठरेल. सप्ताहात गुरू राशीपरिवर्तनात 'या' राशींची होणार आर्थिक भरभभराट ! जाणून घ्या या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

[ सिंह, तूळ, धनु ]

सप्ताहात उत्तम ग्रहयोग लाभल्याने आपण आपल्या शब्दाने लोकावर हुकुमत गाजवाल. भाग्य वृद्धीचा योग येईल. कौटुंबिक सुख उत्तम मिळेल. स्वप्रयत्नाने धन मिळवाल. नोकरीत असाल तर अधिकार योग प्राप्त होईल. दाग-दागिन्यांचा संग्रह बऱ्यापैकी होईल. हातात नेहमी पैसा खेळत राहील. ओळखीच्या लोकांपासून फायदा होईल. कलाकारांना योग्य ती संधी आपणास मोठे आर्थिक लाभ घडविणारे योग आहेत. स्वतःला सिद्ध कराल. आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. शुभ योगात वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबा तील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल...