Mumbai, मे 24 -- Weather News: महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. तर, नाशिक आणि पुणेसह सात जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला. यामुळे नागरिकांनी दुपारी १२ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, वाशीम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर येथे पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि अकोल्यात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला.

Dombivli Blast Updates: डोंबिवली दुर्घटनेतील मृतांच्या संख्येत वाढ; आतापर्यंत ८ जण...